१६ एप्रिल २०२४ दुबई गव्हर्नमेंट ने हाय अलर्ट दिला होता. खूप पाऊस पडणार हे माहीत होतं, पण हा पाऊस एवढा ऐतिहासिक असेल याची कल्पना अजिबात नव्हती. आन्या, माझ्या Retreat event ची को-होस्ट जर्मनीहून निघाली होती आणि तिचं विमान लँडिंग साठी सिग्नल मिळावा म्हणून रात्री नऊ वाजता दुबईच्या air space मध्ये घिरट्या घालत होतं....
आम्ही २० ते २४ एप्रिल अशी एक Spiritual Retreat शारजा मध्ये organize केली होती. १४ participants १२ वेगवेगळ्या देशांमधून १९ तारखेला येणार होते.
१७ आणि १८ एप्रिल असे एकूण दोनच दिवस उरले होते आणि हा पाऊस! संपूर्ण दुबईला हलवून सोडणारा... मी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशी म्हणाले "All is well! आपण ठरवलं आहे, ते पार पडणार!"
आता तुम्ही म्हणाल कसली हो ही रिट्रीट? काय होतं यात नक्की? - आता ते सांगण्यासाठी थोडंसं मागे जावं लागेल.
आपण सर्वच जण आपलं आयुष्य आपापल्या पद्धतीने जगत असतो. लहानाचं मोठं होणं, शाळेत जाणं, चांगले मार्क्स मिळणं, चांगली करिअर, मग लग्न, मग मुलं, आणि मग एक सर्वसाधारण जीवन हे प्रत्येकच जण जगतो. हे सगळं चालू असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग येतात ज्यामुळे आपण कोण, आपण इथे का आलो आपण इथे कशासाठी जगतोय, आपल्या आयुष्याचा उददेश काय हे प्रश्न कधी ना कधीतरी सर्वांनाच पडतात.
मलाही पडले. मी पहिल्यापासूनच बरीच चिंतनशील होते पण खास करून गेल्या पंधरा वर्षांमध्ये मी एका स्पिरीच्युअल एक्स्पिरियन्स मधून गेले. बरीच रिऍलिझशन्स झाली, बऱ्याच गोष्टी आकलनात आल्या. माझं करिअर जे मी कष्टाने उभं केलं, ते आपोआप मागे पडलं. बऱ्याचशा जीवनाबद्दलच्या कल्पना ज्या आपण आपल्या उरात बाळगून असतो, त्या सुद्धा मागे पडल्या. माझे interests बदलले, माझ्या activities बदलल्या, आणि २०१६ मध्ये मी माझे अनुभव कोरा (Quora) नावाच्या वेबसाईट वर शेअर करायला सुरुवात केली.
सध्या जगभरात अनेक लोक spiritual awakening च्या अनुभवातून जात आहेत. त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. मी जे अनुभवतो आहे ते खरं आहे का, आणि मी आता काय करायला हवं? कोण मला ह्यात मदत करू शकेल? असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत. मुख्यत्वे करून स्त्रिया, ज्या एका विशिष्ट फेज मधून जात आहेत, त्यांना काही अनुभव येत आहेत आणि त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांना समजू शकत नाहीत. त्यांचं कन्फ्युजन शेअर करण्यासाठी त्यांना अशी व्यक्ती भेटत नाही की जी त्यांना समजून घेईल, त्यांचं म्हणणं सहानूभूतीने ऐकेल आणि काहीतरी मार्ग सांगेल.
अशा लोकांशी माझं connection झालं ते २०१६ मध्ये Quora वर! Quora ही एक प्रश्नोत्तरांची वेबसाईटआहे जिथे तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता किंवा इतरांनी विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही उत्तर देऊ शकता. मी सहज माझं understanding share केलं, आणि माझ्या काहीही डोक्यात नसताना माझ्या उत्तरांवर मला जगभरातून अनेक लोक चांगला प्रतिसाद देऊ लागले. काय होतंय ते माझ्या लक्षात यायच्या आधीच गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये मी जवळजवळ ५००० प्रश्नांची उत्तरं दिली आहेत त्याला मिलिअन्स मधे views मिळाले आहेत.
हे सगळं होत असताना अनेक लोक मला personal मेसेज करून प्रश्न विचारू लागले. पहिल्यांदा मी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचं शंका निरसन केलंही, पण जसजशी लोकं वाढू लागली तसतसं मला त्यांना वेळ देणं कठीण होऊ लागलं. याच सुमारास मी एक YouTube चॅनेल सुरू केला, त्यातूनच नंतर online Zoom sessions ची सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षात १००० पेक्षाही जास्त लोकांशी मी वैयक्तिकरित्या संवाद साधला.
त्यानंतर लोक मला पर्सनली भेटण्याची इच्छा व्यक्त करू लागले. ऑनलाइन भेटणं आहेच पण पर्सनल कनेक्शन वेगळं! आपण पर्सनली कधी भेटू शकतो का? नंतर कोणीतरी एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करण्याबद्दलही सुचवलं.
माझ्याही डोक्यात ही कल्पना आली होती. माझ्या लक्षात येत होतं की फक्त ऑनलाईन सेशन्स घेऊन उपयोग नाही तर त्यापेक्षाही पुढे जाऊन अजून काहीतरी करण्याची गरज आहे. आपल्या दैनंदिन जीवनातून बाहेर पडून आपल्यासारख्याच अनुभवातून जात असणाऱ्या इतर लोकांबरोबर जोडलं जाऊन त्यांच्याबरोबर आपले अनुभव शेअर करण्याची संधी मिळायला हवी आणि तितकाच स्वतःबरोबर वेळ घालवून थोडसं चिंतन करण्याची संधीही प्रत्येकाला मिळायला हवी. जेव्हा आपण घराबाहेर पडतो आणि आपल्यासारख्याच इतर लोकांच्या चॅलेंजेस ना जवळून बघतो त्यांच्याशी बोलतो तेव्हा आपल्याला आपण कुठे चुकतो आहोत किंवा आपण काय आणि कुठे प्रगती करायला हवी हे लक्षात येतं, पण त्यासाठी तुमच्या नॉर्मल दैनंदिन जीवनापासून, त्याच त्याच लोकांपासून, त्याच त्याच वातावरणापासून बाहेर पडणे आवश्यक असतं.
आपण असं काहीतरी करावं हा विचार माझ्या मनात होता, पण त्यावर कृती करणं जवळजवळ अशक्य वाटलं. इव्हेंट म्हणून नियोजन करणं ही एक मोठी गोष्ट होती आणि मी त्या सर्व नियोजन आणि व्यावहारिक गोष्टींपासून दूर पळत होते. नेमकं त्याच वेळी जर्मनीला राहणाऱ्या आन्याने माझ्याकडून एक ऑनलाईन session घेतलं आणि असा एखादा इव्हेंट मी करावा असा विचार व्यक्त केला. ती इतकी उत्साहात होती आणि तिने मला अनेक कल्पना दिल्या आणि मदत करायची सुद्धा तयारी दर्शवली. कधी कधी आपल्याला कोणीतरी अशी साथ देणं खूप गरजेचं असतं ते मला मिळालं आणि आम्ही दोघांनी या कल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली!
आम्हा दोघींसाठीही हा पहिलाच अनुभव होता त्यामुळे मनात शंका होत्या. आपल्याला हे सर्व झेपेल ना, पण आम्ही देवावर आणि आम्हा स्वतःवर विश्वास ठेवायचं ठरवलं. आता सगळ्या जगभरातून लोक येणार तर ही retreat कुठे करावी हा प्रश्न होता. मी हा event दुबई मध्येच करायचं ठरवलं, कारण माझ्यासाठी हे सर्व मॅनेज होणं गरजेचं होतं. शिवाय दुबई ही तशी मध्यवर्ती जागा! जगातून कुठूनही एखादा माणूस इथे येणार असेल तर खूप जास्त प्रवास करावा लागत नाही.
नोव्हेंबर २०२३ मध्ये, अन्या व्यक्तिशः भेटण्यासाठी जर्मनीहून आली.
अन्या गेली २५ वर्ष शुक्र तारा (प्लॅनेट व्हिनस) आणि त्याच्याशी संबंधित spirituality ह्यावर वर काम करते. तिचं Human soul, अध्यात्म, UFOs, aliens आणि त्यांचा स्पिरिच्युअलिटीशी असलेला आणि human evolution शी असलेला संबंध, यावरचं knowledge अफाट आहे, तिनं त्यात भरपूर काम केलं आहे.
ती दुबईत आली तो आठवडा मी कधीच विसरणार नाही! दुबईच्या बीचवर गरमागरम कॉफी पीत पीत वेगळ्या वेगळ्या विषयांवर गप्पा मारणं हा आम्हा दोघांसाठी खूप छान अनुभव होता. आम्ही अनेक विषयांवर बोललो – souls, यूएफओ, प्लॅनेट व्हिनस आणि तिथलं life, अटलांटिस, लॉस्ट सिव्हिलिझशन्स, timelines आणि अजून खूप काही!
या सगळ्या व्यतिरिक्त सांगायचं म्हणजे आमची व्यक्तिमत्व एकमेकांपासून इतकी वेगळी होती की पहिल्यांदा काही गोष्टी समजून घेताना थोडंसं अवघड गेलं. जेव्हा एखादी व्यक्ती ऑनलाईन भेटते तेव्हा तिच्याशी साधलेला संवाद आणि ती व्यक्ती तुमच्यासमोर हजर असताना तिच्याशी साधलेला संवाद त खूप फरक आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये एकमेकांपासून आम्ही भिन्न होतो, आम्ही बऱ्याच गोष्टींबद्दल अक्षरशः दोन ध्रुव होतो, तरीही चांगली गोष्ट अशी की आम्हाला या गोष्टींची जाणीव होती आणि आम्ही आमच्या दृष्टीकोनातील फरक सहजतेने आणि स्वीकृतीने handle करू शकलो.
आता, आमच्यासाठी मुख्य विषय होता retreat साठी जागा निश्चित करणे.
लोकेशन सिलेक्ट करण्याबाबतचे माझे विचार फारच आदर्शवादी होते. छान वाळवंटामध्ये एक्झॉटिक असा एकांत देणारी एखादी सुंदर जागा जिथे उंट आहेत, ओएसिस आहे आणि सगळं कसं परफेक्ट आहे. मला शहरामधलं कोणतंही ठिकाण नको होतं कारण दुबई म्हणजे लक्झरी. आम्हाला लक्झरी नको होती. आम्हाला वाळवंटाचा शांतपणा, साधेपणा हवा होता जो आपल्याला चिंतन करायला भाग पाडेल. त्यामुळे आम्ही शहराबाहेरील अधिक शांत ठिकाणे शोधू लागलो.
आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्यासाठी ३ दिवस घालवले आणि काहीतरी आमच्या अपेक्षा पूर्ण करणारं एकही ठिकाण आम्हाला मिळालं नाही. समुद्रकिनारा सुंदर आहे, पण पूर्ण ग्रुप साठी योग्य मीटिंग रूम उपलब्ध नाही. मीटिंग रूम चांगली आहे पण मोकळी जागा नाही…सगळं चांगलं आहे पण किंमत जास्त आहे…वगैरे अडचणी सगळीकडे होत्या.
तिसऱ्या दिवशी संध्याकाळी उशिरा, आम्ही निराश होतो आणि गोंधळून गेलो होतो, आम्ही कुठे चुकतो आहोत का हे काळत नव्हतं. खूप काही करायचं होतं आणि आम्ही लोकेशन शोधण्यात अडकलो होतो.
एव्हाना माझा आदर्शवाद कुठच्या कुठे पळाला होता. मला समजून चुकलं होतं की एवढं आदर्श ठिकाण मला मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपला हेतू आपण कशासाठी हे सगळं करत आहोत! कोणत्या ठिकाणी करत आहोत ही गोष्ट दुय्यम आहे.
उद्या पुन्हा अजून जागा पाहू, असा विचार करून आम्ही आन्याच्या हॉटेलकडे परतत होतो, मी ड्राईव्ह करत होते, आन्या शून्यात कुठंतरी बघत होती... अचानक ती मोठ्याने म्हणाली - “Our spirit guides, I know you will show us the way! Thank you!!"
काही मिनिटांत मला एक वळण दिसलं आणि मी मनात विचार केला – ह्या बाजूला छान waterfront आहे. कदाचित इथे काही चांगली हॉटेल्स सापडतील. मी तो एक्झिट घेतला आणि आजूबाजूला पाहू लागले. एका मोठ्या राऊंड-अबाऊट वर आम्हाला एका उंच इमारतीचं नाव दिसलं - हॉटेल आर्याना.
"इथे बघायचं का?" मी विचारलं आणि आम्ही आत गेलो. “आम्ही तुमची मीटिंग रूम पाहू शकतो का? आम्हाला काहीतरी खुलं आणि छान हवं आहे.”
"Skyroom" दाखवण्यासाठी कोणीतरी आम्हाला २६ व्या मजल्यावर घेऊन गेलं. पूर्ण काचेच्या भिंती असलेली गोलाकार खोली आणि त्याला लागूनच एक गच्चीवजा गोल गॅलरी, जिथून तुम्ही संपूर्ण शहर आणि वॉटरफ्रंट पाहू शकता.
"Wow! Amazing!" आन्या उद्गारली.
ज्या क्षणी आम्ही इथे प्रवेश केला, त्याच क्षणी माझ्या डोळ्यासमोर सगळे इथे कसे बसले आहेत, हे दृश्य आलं. मी आन्याकडे हसून पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर तेच हसू होतं. नंतर सगळ्या गोष्टी घडत गेल्या.
आर्याना हॉटेल जवळपास शहरातच होतं, आम्हाला हवं तसं perfect नव्हतं. बाहेर फारशी जागा नव्हती. पण ही जागा बघताच हे क्लिअर झालं कि हीच ती जागा!
ह्या हॉटेलची निवड म्हणजे 'blessing in disguise' च होतं... कसं ते पुढे वाचा!
~~~~~*~~~~~
१६ एप्रिल २०२४, दुबईच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस. अतिवृष्टी आणि पूर!
दुबई गव्हर्नमेंट ने हाय अलर्ट दिला होता आणि सतत ६ तास मुसळधार पाऊस पडत होता! पूर्वी कधीच झाला नाही असा पाऊस पडला. सुरुवातीला मी पावसाच्या announcement मुळे खूश होते कारण यामुळे आमच्या retreat मधे तापमान कमी होईल, हवा छान असेल. पण झालं भलतंच!
बघावं तिकडे सगळे रस्ते पाण्याने तुडुंब भरत होते.. मला थोडी काळजी वाटू लागली.
आन्याने मला विमानातून message केला - त्यांचं विमान दुबई च्या air space मध्ये फेऱ्या मारत आहे आणि त्यांना उतरण्याचा सिग्नल मिळत नाहीय. त्यांना बहारिन आणि नंतर अबुधाबीला वळवण्यात आले. आन्या २ तासांनंतर अबुधाबीमध्ये सुरक्षितपणे उतरली, आणि ५ तास अडकून पडली. विमानतळावर प्रचंड गोंधळ उडाला होता. तिचं सामान belt वर आलं नव्हतं. ती रात्र तिने विमानतळावरच काढली. नंतर समजलं की सर्व सामान Zurich ला परत गेलं कारण पूरग्रस्त विमानतळामुळे ते उतरवू शकले नाहीत. पुढचं पुढे पाहू - असा विचार करून दमलेल्या आन्याने दुबईला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. पूरग्रस्त परिस्थितीत ५ तासांच्या साहसी सहलीनंतर ती सामानाशिवाय हॉटेलमध्ये पोहोचली.
दुबई विमानतळाची दुरवस्था झाली होती आणि त्यादिवशी विमानतळाचं सारं कामकाज स्थगित करण्यात आलं! बरीच flights cancel झाली. विमानतळ परत कधी कार्यान्वित होणार हे आम्हाला माहित नव्हतं. आमचे participants १९ एप्रिलला येणार होते! फक्त दोन दिवस बाकी होते! मी पुन्हा स्वतःला बजावलं - All is well.
आम्ही news updates वर लक्ष ठेऊन होतो. दुबई गव्हर्नमेंटला खरोखर दाद द्यायला पाहिजे, कारण अवघ्या २४ तासांत त्यांनी विमानतळ परत कार्यान्वित केले. विस्कळीत अवस्थेत का होईना, flights सुरु झाली.
आमची आणखी एक participant डॅनिएला देखील या गोंधळात अबु धाबीमध्ये उतरली, कसे तरी ती एका हॉटेलमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाली.
१९ तारखेला रात्री प्रिया भारतातून येणार होती, भारताबाहेर प्रवास करण्याचा तिचा पहिला अनुभव होता, तेही तिच्यासोबत कोणीही नसताना. तिच्या कुटुंबीयांनी सहल रद्द करण्याचा आग्रह धरला. पण तिने माघार न घेता सर्व आव्हाने पेलली आणि तिची फ्लाइट ३ तास उशीरा लँड झाली.
माल्टा मधून येणारा टॉम संपूर्ण दिवस ॲमस्टरडॅम विमानतळावर अडकला होता, त्याचं फ्लाइट ३ वेळा रद्द केलं गेलं.
कार्ला आणि इंदिरा न्यूयॉर्कहून आल्या, कुवेतला उतरल्या आणि त्यांच्या कनेक्टिंग फ्लाइटला दुबईसाठी दोनदा उशीर झाला.
बाहेरून येणाऱ्या सर्वांची ही परिस्थिती होती तर माझ्या घराच्या आसपास पुराचे पाणी! आमचा परिसर पूर्णपणे पाण्याने वेढलेला होता, आम्हाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता! माझी मुलगी नित्या retreat volenteer म्हणून काम बघणार होती. प्रश्न होता हॉटेल पर्यंत कसं पोचायचं, हा! अजून आन्याला भेटायचं होतं आणि हॉटेलमध्ये आवश्यक ती तयारी करायची होती.
आम्ही तसंच बाहेर पडण्याचा आणि मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. आमच्या घरापासून जेमतेम ३.५ किमी अंतरावर असलेलं आर्याना हॉटेल. गाडीने पोहोचायला ५ मिनिटं लागतात! पण त्या दिवशी आम्ही चालत, उड्या मारत, चढत, पोहत तिथं पोचलो. २ तास लागले! आमच्यासाठी हा अनुभव साहसी, तरीही आनंददायी आणि अविस्मरणीय होता!
या सर्व गोंधळात, मनात एक गोष्ट कायम होती - All is well! काळजी करण्याची गरज नाही. सगळ्यात महत्वाच म्हणजे, सगळे participants माझ्यासारखेच cool होते. त्रास झाला पण सर्वांनी तो सकारात्मकतेने handle केला. प्रत्येकाला flight delay, cancelations, अनिश्चितता अशा समस्यांना सामोरं जावं लागलं.. पण प्रत्येकजण खंबीर होता. सर्वजण सुखरूप आणि वेळेवर पोहोचले.
प्रत्येकासाठी, ही retreat २ दिवसांपूर्वीच सुरू झाली. आम्ही सर्वजण "आपल्या हातात काही नाही, देवावर भरवसा ठेवा आणि पुढे चला" - ह्या प्रक्रियेतून गेलो, आपोआप च present moment मध्ये आलो. आमच्या सर्व अपेक्षा आपसूकच सुटल्या आणि जेव्हा एकत्र आलो तेव्हा आम्ही खरोखरच retreat खर्या अर्थाने अनुभवायला सज्ज होतो.
पाण्याचा पूर, electrivcity breakdown, रोड ब्लॉक किंवा इतर अनेक challenges दुबईभर होते. जिथे हे challenges नाहीत, पाणी नाही, रोड ब्लॉक नाही, electricty आहे, अशा काही मोजक्या ठिकाणांमध्ये आर्यना हॉटेल हे एक होतं. आर्यानाचा परिसर कोरडा होता आणि विमानतळापासूनचे रस्ते सुरळीत चालू होते. तेव्हाच आमचा Divine guidance आम्हाला या हॉटेलपर्यंत का घेऊन आला असावा ते लक्षात आलं! आम्ही मनोमन कृतज्ञता व्यक्त केली.
आणखी एक surreal अशी गोष्ट म्हणजे, आन्या तिचा लॅपटॉप वापरू शकत नव्हती कारण तिचा चार्जेर तिच्या सामानातून Zurich ला पोचला होता. Opening च्या दिवशी सकाळी माझा लॅपटॉप काम करायचा थांबला.
"हे काय होतय?" मी आन्याला विचारले.
आम्हाला आता खात्री होती की आमच्या लॅपटॉपसकट बहुतेक गोष्टी आमच्याकडून काढून घेतल्या जात होत्या. आम्ही तयार केलेलं सगळं मटेरिअल लॅपटॉपवर होतं. वेळ कमी होता. माझा नवरा पीयूष घाईघाईने आला पण त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही.
मग मी म्हंटलं, “हा आपल्यासाठी message आहे! आपल्या spirit guides ना आपण लॅपटॉप सारख्या उपकरणांवर अवलंबून राहावं असं वाटत नाही.आपण आपलं काम आपली intuition वापरून केलं पाहिजे. ते म्हणत आहेत -- आत्ताच्या क्षणात रहा, स्वतःमध्ये या! जे आहे ते तुमच्यातच आहे!” आम्ही डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला आणि तयारी सुरू ठेवली.
या retreat मधील माझा सर्वात मोठा धडा म्हणजे वर्तमान क्षणी (present moment मधे ) राहणे आणि जीवनाच्या प्रवाहाबरोबर जाणे – हा धडा आम्ही अक्षरशः ५ दिवस जगलो आणि हा एक जीवन बदलणारा अनुभव होता. मी माझ्या लॅपटॉपवर करू शकले असते त्यापेक्षा अधिक चांगल्या फोकसनं , मला करायचं ते सर्व मी करू शकले!
Retreat मध्येही, प्रत्येकाला एकमेकांशी align होण्यासाठी आणि खरोखर एक group म्हणून एकत्र येण्यास थोडा वेळ लागला. प्रत्येकाला खूप काही बोलायचं होती, share करायचं होतं! ही retreat सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने आपला हेतू स्पष्टपणे निश्चित केला होता आणि मला आशा आहे की बहुतेकांनी स्वतःसाठी ठरवलेले हेतू काही औंशी का होईना, सफल झालं. Retreat मध्ये अनेक सत्रे, प्रश्नोत्तरे, ध्यान, प्रक्रिया यांचा समावेश होता. दिवस भरलेले होते आणि बरेच काही करायचं होतं! पुरामुळे आम्हाला पौर्णिमेच्या रात्री ठरवलेली आमची वाळवंटाची सहल रद्द करावी लागली पण आम्ही जवळच्या एका सुंदर ठिकाणी मजा केली आणि त्यानंतर आमच्या Skyroom च्या गच्चीवर Fullmoon meditation केलं.
ह्या retreat ची ठळक वैशिष्ठ्ये – तुमच्या अंतरात्म्याशी कसा संवाद साधायचा (How to connect with your higher self and higher guidance), जगरहाटी मधून बाहेर कसे पडायचे (How to release societial templates), बालपणी झाले आघात कसे हील करायचे (How to heal childhood trauma), एकता चेतना – प्रेम (Oneness consciosness and Love), पृथ्वीचे परिवर्तन आणि शुक्र ताऱ्यावरील अध्यात्म (Earth transformation and Venusian Spirituality), पृथ्वी आणि वैश्विक ग्रिड्स एकत्रीकरण (Earth and Cosmic grids integration)
सहभागी देश - चीन, क्रोएशिया, जर्मनी, भारत, आयर्लंड, नेपाळ, नेदरलँड, माल्टा, पोलंड, त्रिनिदाद, UAE, USA
.jpg)
.jpg)

.jpg)



.jpg)

No comments:
Post a Comment