Friday, May 10, 2024

माझी पहिली Retreat आणि All is well!

 

१६ एप्रिल २०२४ दुबई गव्हर्नमेंट ने हाय अलर्ट दिला होता. खूप पाऊस पडणार हे माहीत होतं, पण हा पाऊस एवढा ऐतिहासिक असेल याची कल्पना अजिबात नव्हती. आन्या, माझ्या Retreat event ची को-होस्ट जर्मनीहून निघाली होती आणि तिचं विमान लँडिंग साठी सिग्नल मिळावा म्हणून रात्री नऊ वाजता दुबईच्या air space मध्ये घिरट्या घालत होतं....

आम्ही २० ते २४ एप्रिल अशी एक Spiritual Retreat शारजा मध्ये organize केली होती. १४ participants १२ वेगवेगळ्या देशांमधून १९ तारखेला येणार होते. 

१७ आणि १८ एप्रिल असे एकूण दोनच दिवस उरले होते आणि हा पाऊस! संपूर्ण दुबईला हलवून सोडणारा...  मी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशी म्हणाले "All is well! आपण ठरवलं आहे, ते पार पडणार!"

आता तुम्ही म्हणाल कसली हो ही रिट्रीट? काय होतं यात नक्की? - आता ते सांगण्यासाठी थोडंसं मागे जावं लागेल.